Skip to main content

टिपेश्‍वर वन्‍यजीव अभयारण्‍य

टिपेश्‍वर वन्‍यजीव अभयारण्‍य

परिचय

Gretel Ehrlich म्हणतात कि निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला आमंत्रित करीत असते आणि आपण कोण आहोत त्याची सातत्याने जाणीव करून देते. पृथ्वीने मानवाला नेहमीच त्याच्या विचारांच्या, अपेक्षांच्या, क्षमतेच्या आणि अपेक्षेपेक्षा जास्तच दिले आहे ज्याचे स्वरूप नितळ आणि निर्मळ आहे. त्याच सुंदर पुस्तकातील एक पान म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य होय.

टिपेश्वर ला त्याचे नाव आणि ओळख टिपेश्वर गावात स्थित असलेल्या टिपाई देवी मंदिरामुळे मिळाली. १९९७ जानेवारी ला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झालं. पाटणबोरी व पर्वा पर्वत श्रेणी दरम्यान पसरलेल्या पांढरकवडा वन्यजीव विभाग अंतर्गत टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याचे अस्तित्व आहे ज्यात जवळ जवळ १४८.६३ चौकी चे घनदाट जंगल उभे आहे. कृष्णा,ताप्ती, भीमा आणि पूर्णा नदीच्या जीवनदायी प्रवाहामुळे तेथील जैवविविधता संपन्न आहे. हे अभयारण्य 'Green Oasis of Maharashtra' म्हणून नावाजले आहे.

आकर्षण : धार्मिक/ प्राकृतिक /ऐतिहासिक स्थळे:

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य अलीकडेच महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. सस्तन प्राण्यांच्या जवळपास २५ प्रजाती,पक्षांच्या १२५ प्रजाती आणि उभयचर व सरीसृपांच्या २२ प्रजाती असलेले हे अभयारण्य प्रत्येक निसर्ग प्रेमाचे आश्रय स्थान आहे. अभयारण्य क्षेत्रनिहाय लहान असून येथे १२-१४ वाघांचा मुक्त संचार आहे,  ज्यामुळे व्याघ्र दर्शनाची शक्यता वाढते आणि अभयारण्य पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करते. बिबट्या, रानमांजर ,लांडगे, अस्वल, नीलगाय, खोकड, तडस, चितळ,सांबर, चौसिंगा यांसारख्या अनेक वन्यजीवांचे देखील दर्शन घडते.
 
या अभयारण्यात मोर, घुबड, सर्पगरुड, अनेक प्रकारचे पाणथळ पक्षी आहेत. अभयारण्याच्या लहान क्षेत्रामुळे वन्यजीवांचे दर्शन खूपच सोपे आहे, पण घनदाट जंगल असल्याने पक्षी शोधणे थोडे अवघड जाते.

थिंग्स टू डू:
१. जंगल सफारी: टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य पर्यटनांसाठी नेहमी खुले असते. येथे जंगल सफारी स्वस्त दारात उपलब्ध आहे. अभयारण्यात पसरलेल्या सुमारे ६० किमी क्षेत्रामध्ये जंगल सफारी केली जाते. सुन्ना व मथानी या दोन प्रवेशद्वारांमधून सफारीकरिता प्रवेश करता येतो. सफारी स्थानिक किंवा वैयक्तिक वाहनाने केल्या जाऊ शकते परंतु प्रवेश करण्यापूर्वी स्थानिक मार्गदर्शकाची नेमणूक करणे अनिवार्य आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आजही पूर्णतः अवगत नसल्याने तेथे असलेल्या वन्यजीव आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नियम निर्बंध करण्याची गरज आहे.

एंट्री गेट्स/ प्रवेशद्वार:
NH ४४ (श्रीनगर-कन्याकुमारी महामार्ग) टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पूर्व सीमेवरून जातो. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत, दोन्ही प्रवेशद्वारांजवळ निवास करण्यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत.

१. सुन्ना गेट:हे प्रवेशद्वार पांढरकवडा येथून केवळ १५ किमी अंतरावर आहे. हे द्वार NH ४४ महामार्ग जवळ असल्या कारणाने पर्यटक मथानी प्रवेशद्वारापेक्षा येथे जाणे जास्त पसंत करतात. प्रवेशद्वारावर NIC(Nature Interpretation Centre) उभारले गेले आहे. अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वी NIC ला भेट देणे उपयुक्त ठरते, अभयारण्यातील वनस्पती आणि वन्यजीवांची ओळख होण्यास येथे मदत मिळते.

२. मथानी गेट: हे प्रवेशद्वार पंढरकवड्यापासून २३ किमी अंतरावर असल्याकारणाने पर्यटक येथे जाण्यास प्राधान्य देत नाही म्हणून ते सुन्ना गेट इतके लोकप्रिय झाले नाही.

भेटीसाठी उत्तम वेळ:
या अभयारण्याभोवती भामरागड वन्यजीव प्रकल्प, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, चपराळा वन्यजीव अभयारण्य, बोर व्याघ्र प्रकल्प आणि पैनगंगा राष्ट्रीय उद्यान अशाप्रकारे बलाढ्य  वन्यजीव क्षेत्राने हा प्रदेश व्यापलेला आहे. या सर्व उद्यानांचा वापर करून असंख्य वाघ येथे मुक्त संचार करतात. आणि याच उद्यानातून टिपेश्वर वन्यजीव
अभयारण्यात वाघांची फिरस्ती चालू राहते, म्हणूनच मार्च ते मे  हा कालावधी अभयारण्यास भेट देण्यासाठी उत्तम ठरतो.

येथे कसे पोहोचावे/मॅप:
रेल्वे: टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य अनेक लहान आणि मोठ्या रेल्वे स्थानकांच्या सान्निध्यात आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुलगाव आहे जे ७२. ९ किमी अंतरावर आहे.

रस्ते मार्ग: 
राष्ट्रीय महामार्गावर (श्रीनगर कन्याकुमारी महामार्ग क्र. ४४ ४४) स्थित असल्यामुळे, हे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांद्वारे संपूर्ण देशाला अपवादात्मक रस्ता जोडणी देते.
यवतमाळ ते टिपेश्वर - .७४.९ किमी, २ ता २१ मिनिट (एमएच एसएच २७७ आणि एसएच २७७ मार्गे)
पंढरकवडा ते टिपेश्वर - ४३.८ किमी, १ ता २५ मिनिट (एमएच एसएच २३३ मार्गे)
आदिलाद ते टिपेश्वर - .७३.९ किमी, १ ता मि ४८ मिनिट (आदिलाबाद-नागपूर आरडी मार्गे)
नागपूर ते टिपेश्वर - १९ किमी, ४ ता २३ मिनिट (एनएच ४४ मार्गे)
पुणे ते टिपेश्वर- ६१९ किमी, १५ ता २१ मिनिट (एनएच ७५२ मार्गे)
रायपूर ते टिपेश्वर - ४७० किमी, १० ता २३ मिनिट (एनएच ५३ - एनएच ४४ मार्गे)
हैदराबाद ते टिपेश्वर - ३७९ किमी, ७ ता ४५ मि (एनएच ४४ मार्गे)
औरंगाबाद ते टिपेश्वर - ४०१ किमी,९ ता ४८ मि (औरंगाबाद-नागपूर आरडी मार्गे)
जबलपूर ते टिपेश्वर - ४६९ किमी, ९ एच ३७ मिनिट (एनएच ४४ मार्गे)
मुंबई ते टिपेश्वर - ७६१ किमी,१७ ता ५१ मिनिट (बेंगलोर-मुंबई हायवे मार्गे)
बंगलोर ते टिपेश्वर - ९७० किमी, १६ ता २६ मिनिट (बंगलोर - हैदराबाद मार्गे)
सिकंदराबाद ते टिपेश्वर - ३७२ किमी,७ ता २१ मिनिट
नाशिक ते टिपेश्वर - ५९७ किमी, १३ ता ५२ मिनिट (महाराष्ट्र एसएच ३० मार्गे)

विमानतळ: नागपूर विमानतळ(डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ) जे भारतातील मोठ्या साहहरांशी नियमित पणे हवाई मार्गाने जोडलेले आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याचे सर्वात जवळचे विमानतळ १८६ किमी ४ तास अंतरावर नागपूर आहे. विमानतळावर टॅक्सी गाड्या भाड्याने मिळू शकतात.

लोकल असिस्टंस/ स्थानिक साहाय्य:
शास्त्री नगर पांढरकवडा