Skip to main content

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प

परिचय:

 भारताच्या मध्यभागी वसलेले नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प(NNTR) याला १२ डिसेंबर २०१३ रोजी प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, भारताचा ४६ वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले. भारतातील जवळ जवळ एक षष्ठंउंश (16th) व्याघ्र संख्या याच प्रकल्पात अस्तित्वात आहे, हे महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यात  असून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याजवळ स्थित आहे. हे व्याघ्र प्रकल्प त्याची सीमा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ़ या राज्यांसह वाटून घेते. परिणामी, एनएनटीआर मध्यप्रदेशातील कान्हा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगढ़ मधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प सोबतच अप्रत्यक्षपणे तेथील अचानकमार व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणातील कावल-नागार्जुनासागर व्याघ्र प्रकल्प यांच्याशी विविध मार्गांद्वारे जोडले गेले आहे. 

एनएनटीआरमध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य,नागझिरा वन्यजीव अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे, वनक्षेत्राचा एकूण क्षेत्रफळ १३३.८८ चौ.किमी असून त्यापैकी १७. ६ हेक्टर नागझिरा अभयारण्याला देण्यात आले आहे, तर २५१.४६ हेक्टर जमीन कोका अभयारण्यास देण्यात आली आहे. WLP Amendment Act च्या सेक्शन ३८ (v) नुसार संपूर्ण उर्वरित क्षेत्र अतिसंरक्षित व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

दोन राज्यात वितरित, एनएनटीआर चे दोन भाग अनेक गावे, रेल्वे मार्ग आणि महामार्गांना विकीर्ण करते. तरीही निसर्ग संरक्षणाच्या दृष्टिकोनातून याला खूप महत्व लाभले आहे. नयनरम्य डोंगरदऱ्या ते घनदाट जंगल व वन्यजीवांने एनएनटीआर समृद्ध आहे. जंगलातील सफारी आणि निसर्ग भ्रमण पर्यटकांना निसर्गाशी एकरूप होण्याकरिता संधी उपलब्ध करून देते. परिसराला लाभलेल्या हिरवेगार घनदाट जंगल आणि अमृतमय पावसामुळे ते शेजारच्या शहरांसाठी ग्रीन लंग्ज म्हणून काम करते आणि पर्यावरणाचा समतोल राखते.

फ्लोरा: 

हे वनक्षेत्र कोरडे-पानगळ प्रकाराचे वन असून, पावसाळ्यात मात्र हिरवेगार होते आणि उन्हाळ्यात पानगळ होताच शुष्क होऊन जाते. जंगलाची हिरवीगार झालर तेथील अस्तित्वात असलेल्या विविधप्रकारचे झाडे झुडपे, औषधी वनस्पती आणि गवतांच्या मदतीने तयार झाले आहे. येथे आढळणाऱ्या काही प्रमुख वृक्षप्रजाती म्हणजे सागवान, हळदू, जांभूळ, कवट, मोहा, ऐन, भेळ, भोर, अर्जुन व अन्य तसेच अनेक प्रकारचे झुडपे देखील आढळतात जसे कि होलार्रोहोएना अरबोरिया, र्रिथिया टिंक्टोरिया आणि वुडफोर्डिया फ्रक्टिकोसा हे अभयारण्याच्या सर्व भागात सहज आढळते. येथे काही वेलींचे प्रकार देखील आढळतात जसे कि बुटेआ सुपरबा, अकेशिया पिनाटा आणि झीझीफस ओनोप्लीया. व्याघ्रप्रकल्पाच्या मध्यवर्ती भागात आर्द्र भूमी उपलब्ध असल्याने तेथे बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो, एकूणच संपूर्ण क्षेत्रात विविध प्रकारचे शोभेचे औषधी, सुगंधी आणि आर्थिकरित्या महत्व असलेले वनस्पती आहेत.

फौना:

 नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्रात मोठ्या संख्येने वन्यजीव आहे. नवेगाव परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जात असले तरी वाघ, बिबट, अस्वल, सांबर, चितळ, रानकुत्रे यांसारखे मोठे सस्तन प्राणी येथे आहेत. वनक्षेत्रात एकूण २०९ प्रकारचे पक्षी, ९ प्रकारचे सरीसृप, २६ प्रकारचे सस्तन प्राणी ज्यात दुर्मिळ लांडगे, चांदी अस्वल, तडस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त क्षेत्रात असलेल्या जलाशयात अनेक मासे प्रजाती व सभोवताली फुलपाखरे आणि कीटकांची नोंद देखील झाली आहे.

Attraction/ आकर्षणे:

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. गेल्या वर्षभरात साधारणतः ५०००० पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पास भेट दिली आहे. तेथे केवळ  उद्यानेच नव्हे तर सभोवतालच्या परिसरात भरपूर पर्यटन स्थळे आहेत, जसे कि २० किमी अंतरावर असलेले इतिहाडोह धरण हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. सुट्टीचा दिवस आनंददायी घालवण्याकरिता शेजारी असलेल्या गोंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी आणि देसाईगंज यांसारख्या अनेक शहरांमधून पर्यटक येतात.  राष्ट्रीय उद्यानालगत इतर पर्यटन स्थळे देखील आहेत ते म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य केवळ ६० किमी, गोठणगाव येथील टिब्बेट कँम्प केवळ १५ किमी आणि प्रतापगड देखील १५ किमी.  

Best time to visit/ भेटीसाठी उत्तम वेळ: 

नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरिता उत्तम आहे. तथापि उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता अति असली तरी वन्यप्राण्यांच्या दर्शनाची शक्यता वाढते कारण ते जलाशयाच्या अथवा जंगलातील कृत्रिम पाणवठ्यांभवती अगदी सहज आढळतात, म्हणूनच त्यादरम्यान सफारी करण्याची शिफारस केली जाते व आपणास दुर्मिळ वन्यजीवांचे थेट दर्शन घेता येते.  

तेथे कसे पोहचाल:

 Air/ हवाईमार्ग: सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर जे देशातील सर्व प्रमुख शहरांशी चांगलेच जोडलेले आहे.  

 रेल्वे: व्याघ्र प्रकल्प भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्यभागी असून संबंधित रेल्वेस्थानक केवळ ५० किमी अंतरावर आहे. तसेच जवळचे रेल्वेस्थानके  म्हणजे:

  • भंडारा रोड ५० किमी 
  • गोंदिया ५० किमी  
  • सौंदड २० किमी 
  • तिरोरा २० किमी 

रस्ते मार्ग: व्याघ्र प्रकल्प हे साकोली शहरापासून २२ किमी(NH ६ मुंबई-कोलकाता महामार्ग) अंतरावर आहे. भंडारा व गोंदिया हे दोन्ही शहरं  प्रकल्पापासून ६० किमी अंतरावर आहे व एस. टी बस आणि वैयक्तिक वाहनांद्वारे सहज पोहोचता येते तसेच सर्वात जवळील बसस्थानके साकोली व तिरोरा येथे आहेत.