Skip to main content

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य

परिचय

जगभरातील कोट्यावधी पर्यटकांना आकर्षित आणि मनमोहीत करणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित पर्यटन स्थळांनी भारत देश व्यापला आहे. आपला देश घनदाट वनांनी समृद्ध असून अस्तित्वात असलेले दुर्मिळ वन्यजीवांकरिता हि प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध वनक्षेत्र म्हणजे ज्ञानगंगा  वन्यजीव अभयारण्य.
ज्ञानगंगा अभयारण्यातील घनदाट जंगल बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात वसलेले आहे. अभयारण्य उंच शिखरांपासून ते सुंदर गवताळ प्रदेशाने संपन्न आहे आणि सामावलेले दोन तलाव त्याला सुशोभित करतात, ज्याचा उपयोग वन्यजीवांच्या मुख्य जलस्रोताच्‍या स्वरूपात होतो.
अभयारण्य बुलढाणा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर असून खामगाव शहरापासुन २० कि.मी अंतरावर आहे. अभयारण्याला त्याचे नाव नजीक असेलेल्या ज्ञानगंगा नदीमुळे प्राप्त झाले. लगत असलेले ज्ञानगंगा सरोवर व पलढग सरोवर अभयारण्याची शोभा वाढवतात, पावसाळा वगळता वर्षभर संपूर्ण वनसंपदा पाण्याकरिता  याच दोन तलावांवर अवलंबून असते, हे सगळे केवळ २०५ चौ.किमी च्या आत सामावले आहे.  अभयारण्यात प्रामुख्याने बिबट,अस्वल, भेकर, नीलगाय, चितळ, तडस, रानमांजर यांचे अस्तित्व आहे जवळ-जवळ १५० पक्षी प्रजातींना अभयारण्य आश्रय देते ज्यामध्ये स्थानिक व स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे.

आकर्षण : धार्मिक/ प्राकृतिक /ऐतिहासिक स्थळे:

बुलढाणा जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत जे तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि अनुकूल वातावरणाकरिता प्रसिद्ध आहे. स्थानिक पर्यटन मंडळ व खाजगी पर्यटन संस्थेद्वारे पर्यटनाच्या विविध योजना आयोजित केल्या जातात.  बुलढाणा जवळील प्राचीन भौगोलिक महत्व प्राप्त झालेले पर्यटन स्थळ म्हणजेच 'लोणार सरोवर'. या सरोवराची निर्मिती Pleistocene युगात पृथ्वीशी भिडलेल्या लघुग्रहांच्या प्रभावामुळे तयार झाले. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या चार हायपर व्हेलॉसिटी क्रेटर्स पैकी लोणार सरोवर आहे आणि National Geo-Heritage Monument म्हणून अधिसूचित केले गेले आहे.
अभयारण्य क्षेत्रात पुरातत्व दृष्ट्या बरीच महत्वाची स्थाने आहेत ज्यांना वाढत्या पर्यटनात ट्रेंड म्हणून बघितले जाते, जसे कि अजिंठा लेणी, जिजामातेचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, देऊळगांवराजा येथील बालाजी, शेगांवचे गजानन महाराज मंदिर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा व बाळापूरचे किल्ले येथून नजीकच आहे.

वन्यजीव गणना:

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव गणना नियमित केली जाते. वन्यप्राण्यांची योग्य अशी सांख्यिक आकडेवारी प्राप्त व्हावी. त्याकरिता मिश्र पद्धतीने प्राण्यांची मोजणी केली जाते. ज्यात कॅमेरा ट्रॅप्स, Pugmark Impression Pads आणि बौद्ध पौर्णिमेच्या दरम्यान होणाऱ्या मचाण सेन्सस अशा प्रमुख पद्धतीचा वापर केला जातो. प्राणिगणने दरम्यान दुर्मिळ वनजीवांचे दर्शन होते. बिबट, अस्वल, कोल्हा, तडस या प्रमुख प्रजातींसोबत नीलगाय, भेकड, रानडुक्कर, माकड, साळींदर इत्यादी जनावरे आढळतात. मचाण सेन्सस करिता ऐच्छिक पर्यटकांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. पुढील प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या पाणथळ्यांवर पौर्णिमेच्या दिवशी मचाणावर बसण्याकरिता संधी दिली जाते, ज्याने रात्री पाण्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना होते.

फ्लोरा/ फौना:

अभयारण्याच्या भूभाग उंच शिखरांनी आणि गवताळ प्रदेशानी  संपन्न आहे. संपूर्ण पर्वतरांगांमधील अजंता संरक्षित क्षेत्र झाले आहे. परिसरामध्ये असलेल्या वन्यजीवांमुळे ज्ञानगंगा  वन्यजीव अभयारण्य मध्य भारतातील वनसंपदेला महत्व प्रदान करते. अभयारण्यात असलेल्या मंतरगा आणि पलढग धरणांमुळे स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने नोव्हेंम्बर ते मार्च या दरम्यान आढळतात.
वनक्षेत्र हे दक्षिणेकडील उष्ण कटिबंधीय कोरडे पर्णपाती जंगल आहे, येथे प्रामुख्याने सागवान आणि अंजन यांचा समावेश आहे.  संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट, अस्वल, भेकड ,नीलगाय, सांबर, चितळ,तडस,रानमांजर आणि खोकड यांसारख्यांचा समावेश आहे.

 सफारी

अभयारण्यात सर्वात लोकप्रिय कलांपैकी एक म्हणजे वनविभागानी मार्गदर्शित केलेल्या निसर्ग भ्रमणाच्या सहली. सहलीदरम्यान आपणास स्थानिक प्रशिक्षित मार्गदर्शकांची साथ लाभते, ज्यांचे मार्गदर्शन MEDB द्वारे केले जाते. नियतकालीन सकाळ व संध्याकाळी जंगल सफारीचे आयोजन देखील केले जाते. ज्याचे बुकिंग पर्यटकांना अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बुकिंग काउंटर वरन करावे लागते. जंगल भ्रमण करीत असतांना  तेथील गाईड पर्यटकांना साथ देतात परंतु त्याकरिता पर्यटकांची विशिष्ट संख्या गरजेची असते आणि हे अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडे जाण्याअगोदरच तपासावी लागते.

भेटीसाठी उत्तम कालावधी:
अभयारण्यास भेट देण्याची योग्य वेळ जानेवारी ते जून ही आहे कारण वन्यप्राण्यांचे विलोभनीय दर्शन फेब्रुवारी ते मे या कालावधीत होते.


कसे पोहोचावे:


Airport: औरंगाबाद विमानतळ जे २०० किमी  आणि नागपूर विमानतळ अभ्यारण्यापासून ५२५ किमी  अंतरावर आहे.
Railway Station: नागपूर मुंबई महामार्गावर असलेले शेगाव हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जेथे सर्व महत्वपूर्ण गाड्या थांबतात.
रस्ते वहातूक: बुलढाणा शहरापासून ८ कि.मी तसेच खामगांव शहरापासून २० कि.मी हि सर्वात जवळची शहरे आहेत.


उपवनसंरक्षक अधिकारी (वन्यजीव)
जिल्हा न्यायालयासमोर रेल्वे स्टेशन रोड, रामदासपेठ, अकोला - ४४४००१
फो.न: ०७२४- ४३६८६९(O), ४४२५४८(R )