Skip to main content

Katepurna Wildlife Sanctuary

Katepurna Wildlife Sanctuary

परिचय

महाराष्ट्राच्या विदर्भात अकोला जिल्ह्याच्या पायथ्याशी काटेपूर्ण असे सुंदर वन्यजीव अभयारण्य आहे. काटेपूर्ण जलाशयाचे पाणलोट क्षेत्र भवती काटेपूर्ण अभयारण्याचे घनदाट जंगल पसरलेले आहे, हे महाराष्ट्रातील लोकप्रिय अभयारण्यात गणले जाते. घनदाट पसरलेल्या जंगलात विविध प्रकारच्या प्राणी व पक्षांचे निवासस्थान असून बिबट्या, भेकड, नीलगायी, चितळ, अस्वल यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांचा स्थित असलेल्या गवताळ प्रदेशात मुक्त वावर आहे. काटेपूर्ण तलाव पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे प्राण्यांना बारमाही पाणीपुरवठ्याचे उत्तरदायित्व याच जलाशयाकडे आहे. तलाव विविध जलचर व माश्यांनी समृद्ध आहे.

आकर्षण : धार्मिक/ प्राकृतिक /ऐतिहासिक स्थळे:

फ्लोरा/ फौना / वन्यजीव वनस्पती: काटेपूर्ण अभयारण्याचे क्षेत्र लहान असले तरी ते जैवविविधतेने समृद्ध आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ मधील नोंदींपैकी २५ सस्तन प्राणी त्यापैकी ३ धोकादायक स्थितीत गणले जातात ते एक अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात  आढळतात. यात १२३ प्रजातींचे पक्षी समाविष्ट आहे. येथे सापडल्या जाणाऱ्या १९ सरीसृपांच्या प्रजातींपैकी २ प्रजाती धोक्यात आहेत. फुलपाखरांच्या ७४ प्रजाती येथे सहज आढळतात.

Wildlife Census/ वन्यजीव गणना:

काटेपूर्ण अभयारण्यात वन्यजीव संख्या निश्चित करण्यासाठी १९९६ सालापासून नियमित गणना केली जाते. अभयारण्यात बिबट्याचे वर्चस्व सर्वत्र दिसून येते त्याव्यतिरिक्त अस्वल, कोल्हे, चितळ, तडस, नीलगायी हे देखील आढळतात.

धार्मिक/ सांस्कृतिक महत्व:
अभयारण्याच्या पूर प्रदेशातील हेमाडपंथी शिव मंदिर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, लोक वर्षभर तेथे भेट देतात. हे स्थान सध्या विकसित केले जात आहे. अभयारण्य अजिंठा लेणी, लोणार सरोवर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, शेगावचे गजानन महाराज मंदिर, नरनाळा, बाळापूरचे किल्ले आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्ण तलावाचे क्षेत्र प्रदूषणमुक्त आहे.

थिंग्स टू डू:

  • वॉटर स्पोर्ट
  • पक्षी निरीक्षण
  • कॅम्पिंग
  • सायकलिंग
  • ऍडवेंचर स्पोर्ट्स
  • वाईल्डलाईफ सफारी

भेटीसाठी उत्तम वेळ:
उन्हाळा गरम व शुष्क असतो पण हिवाळ्याची थंडी प्रसन्नदायी व आनंददायी ठरते, म्हणूनच ऑकटोम्बर ते जून या कालावधीत अभयारण्याला भेट देणे उत्तम ठरते.

येथे कसे पोहचावे:
आपण अगदी सहज काटेपूर्ण येथे हवाई, रेल्वे, रस्त्यामार्गे पोहोचू शकतो.
विमानतळ: सर्वात जवळचे विमातळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर जे केवळ २५० किमी अंतरावर आहे.

रेल्वे: मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील ३७ किमी अंतरावर असलेले अकोला रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे.

रस्ते मार्ग: काटेपूर्ण अभयारण्य अकोला शहरापासून केवळ ३७ किमी अंतरावर असून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख रस्त्यांना जोडले गेलेले आहे. 

Facilities/ सुविधा:
अभयारण्यात माहिती केंद्र सोव्हेनियर शॉप, वॉच टॉवर,शौचालय, कँटीन, शुद्ध पिण्याचे पाणी, विश्रांती गृह, निवासाकरिता तंबू, ४० लोकांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृहं देखील उपलब्ध आहे, सायकलिंग, कचरा व्यवस्थापन यंत्रणा आदी सोइ-सुविधा पुरविण्यात आल्या आहे, जंगल सफारी व गाईड येथे असलेल्या प्रवेश द्वारावर बुक केले जाते.