Skip to main content

Lonar Crater

Lonar Crater

परिचय

लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार गावांजवळ  स्थित आहे. सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे  ते एक खाऱ्या पाण्याचे पाणथळ असून त्यात कुठलेही जीवजंतू राहू शकत नाही. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण महामंडळाने (Geological survey of India) याला National Geological Heritage म्हणून वर्गीकृत केले आहे. ऐतिहासिक दृष्ट्या या सरोवराची निर्मिती Pleistocene युगात पृथ्वीशी भिडलेल्या लघु ग्रहांच्या प्रभावामुळे तयार झाली. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या चार क्रेटर्स पैकी काळ्या पाषाणामधला हा एकमेव हायपर व्हेलॉसिटी इम्पॅक्ट क्रेटर म्हणून ओळखला जातो.
बुलढाणा शहराच्या आग्रेय दिशेने सुमारे ९० किमी अंतरावर लोणार सरोवर आहे व ८ जून २००० साली त्याला अभयारण्याचा दर्जा देखील प्राप्त झाला. वनसंपत्तीने भरभराट झालेली बेटं सोडली तर या तलावाचा दर्जा तसा कमी मानला जातो. सरोवराच्या सभोवताली सुंदर गवताळ प्रदेश असून इथे अनेक वन्य जीवांचे दर्शन घडते बिबट, रानमांजर, तडस, लांडगा, मोर व अनेक दुर्मिळ पक्षांचे येथे वास्तव आहे. मंत्रमुग्ध करणारा तलाव आणि अभ्यारण्या व्यतिरिक्त हे शहर स्वतःच एक मनोरंजक ठिकाण आहे, जे सुट्टीच्या दिवसात पर्यटनासाठी योग्य आहे.

आकर्षण : धार्मिक/ प्राकृतिक /ऐतिहासिक स्थळे:

लोणार सरोवर: लोणार गावांत असतांना लोणार सरोवरास भेट देणे आवश्यक वाटते. कारण तेथील विहंगम दृश्य आपणास नेहमीच चकित करेल. सरोवर जैवविविधतेने संपन्न असून विविध प्रकारचे वन्यजीव- वनस्पती येथे आढळतात. बिबट, रानमांजर, तडस, लांडगा, मोर यांसारख्या अनेक वन्यजीवांचे दर्शन सरोवराच्या सभोवताली असलेल्या गवताळ प्रदेशात होते.
धार्मिक महत्व: सरोवराच्या सभोवतालची प्राचीन आणि धार्मिक स्थळे या ठिकाणचे महत्व वाढवतात. 'सखाराम महाराज संस्थान, लोणी', 'साखरतली देवी', 'देऊळगांव कुंडपाल' व वास्तू विशारदाच्या हेमाडपंथी शैलीत एकूण तेरा मंदिरे येथे बांधली गेली असून ते अतिशय पवित्र मानले जातात.
गोमुख मंदिर:
गोमुख मंदिर सरोवराच्या किनारी असून त्याजवळ बारमाही पाण्याचा प्रवाह वाहतो, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. वर्षभर प्रवाह असल्याने त्याला पावित्र्य लाभले आहे,अनेक तीर्थ यात्री येथे स्नान देखील करतात.

मोठा मारोती मंदिर: चुंबकीय खडकापासून तयार केलेली हनुमानाची झोपलेली विशाल मूर्ती येथे साकारलेली आहे. या मूर्तीची लांबी ९. ३ फूट असून डावा पाय शनिदेवाच्या छोट्या मूर्तीवर ठेवण्यात आला आहे. आठव्या शतकातील हि मूर्ती लोणार सरोवर तयार करणाऱ्या उल्केच्या खडकापासून तयार केली आहे,त्यामुळे या देवस्थानाचे महती संपूर्ण देशात पसरली आहे.

फ्लेमिंगो वॉचिंग: २०१९ साली लोणार सरोवरात फ्लेमिंगो पक्षांचे प्रथमच आगमन झाले,अनेक पक्षी प्रेमींनी याचा आनंद घेतला आणि ते या भागात पर्यटकांचे आकर्षण म्हणून ठरत आहे.
वार्षिक पशु गणना: वन्य प्राण्यांच्या नोंदणीसाठी लोणार अभयारण्यात दर वर्षी पशु गणना केली जाते. पशु गणना प्रामुख्याने कायमस्वरूपी लक्ष वेधून घेणाऱ्या बिबट्यासाठी केली जाते व  रानमांजरी, लांडगा, तडस, माकड, मोर यांचीही गणना केली जाते. पावसाळ्या दरम्यान मोर नाची सर्वत्र बघायला मिळू शकते, अशाप्रकारे मान्सून पर्यटकांसाठी वर्षातील सर्वाधिक भेट देणारा काळ ठरतो.

भेटीची उत्तम वेळ: लोणारला पावसाळ्यात नक्की भेट द्यावी, त्याचे मुख्य वैभव घनदाट हिरवे जंगल आणि तलावातील लालसर पाणी आहे. ट्रेकिंगसाठी हिवाळा अनुकूल काळ ठरतो. उन्हाळ्यात ते खूप गरम असल्या कारणाने तेथे पर्यटनासाठी जाणे टाळले पाहिजे.

पॅकेजेस:
येथे कसे पोहचावे:
विमानतळ: लोणार हे औरंगाबाद पासून केवळ १८० किमी अंतरावर आहे म्हणूनच औरंगाबाद लोणारसाठी सर्वात जवळचे विमानतळ ठरते., नागपूर विमानतळ येथून ४०० किमी अंतरावर आहे.

रेल्वे स्टेशन: सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन जालना असून लोणार शहरापासून सुमारे ८० किमी अंतरावर आहे. शेगाव रेल्वेस्टेशन तेथून १०० किमी अंतरावर आहे.

रस्ते मार्ग: लोणार बुलढाणा शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. लोणार अभयारण्य खामगांव - बुलढाणा रस्त्यावर असून अकोल्यास पश्चिमेला सुमारे १५० किमी आहे.

स्थानिक सहाय्य/ Local Assistance:
पर्यटना संदर्भात स्थानिक माहिती व मदत मिळवणे:
वन परिक्षेत्र अधिकारी, (वन्यजीव) मेहकर,

मो. क्र: ७८२१०८८८१२